महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा तुळजापूर येथे सत्कार 

वागदरी , दि.१७  , एस.के.गायकवाड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

  दि.१६ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे व त्यांच्या पत्नी सौ.वनिता वसंतराव मुंडे हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले असता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
 
याप्रसंगी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे व  सामाजिक कार्यकर्त्या अन्नपुर्णा मोरे यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची प्रतिमा, कवड्याची माळ,शाल, पुष्पहार देवुन यथोचित त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
   
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व सूत्रसंचलन पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख यांनी केले तर आभार  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे यांनी केले.आपल्या आभार प्रदर्शनपर भाषणात बोलताना अरूण लोखंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे हे महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे प्रेरणा स्थान असून विशेषतहा ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांनाची त्यांना जाणीव आहे.त्यामुळे ते पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करतात.
   यावेळी जेष्ठ पत्रकार इरफान काझी, आप्पा भिसे,राम कांबळे,अक्षय कांबळे,बालाजी घोटमुकले,सह पत्रकार उपस्थित होते.
 
Top