प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलने यंदाही शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के                

 मुरूम, ता. उमरगा, दि. ३० 

 येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा इयत्ता शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदाही या शाळेने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा  कायम राखली आहे.

 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत सर्वच विद्यार्थी उतीर्ण झाले असून यामध्ये अतिफ अबीद पटेल ९१ टक्के (प्रथम), प्रणव राजेंद्र गायकवाड ९०.८० टक्के (द्वितीय), सचिन बीभिशन गडकर ८८.८० टक्के (तृतीय) क्रमांक घेवून उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, सर्व संचालक मंडळ, प्रशालेच्या  मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सच्चीदानंद अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, धनराज हाळळे, जगदीश सुरवसे सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून विशेष अभिनंदन करून कौतुक करण्यात आले.                                   

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचे शालांत परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
 
Top