प्रणाली शिंदे यांचे दहावी परिक्षेत यश 

वागदरी, दि.२९

सिंदगाव तां.दुळजापूर‌ येथील प्रणाली शेषराव शिंदे यांनी इ.१० वी बोर्ड परिक्षेत ८८ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
  
सिंदगाव येथील प्रणाली शेषराव शिंदे यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची वडील रोजगारासाठी गाव सोडून हडपसर पुणे या ठिकाणी रोजंदारीवर काम करतात.घरभाडे कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांच्या शिक्षणाचा खर्च याचा ताळमेळ घातल कुटुंबाचा गाडा हाकतात.असा परिस्थितीतत प्रणाली ही रयत शिक्षण संस्था संचलित साधना हायस्कूल हडपसर पुणे येथे शिक्षण घेत होती.मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी बोर्ड परिक्षेत त्यांनी ८८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.त्यांनी मिळविलेल्या  यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Top