पॅंथर गंगाधर गाडे याना नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) च्या वतीने श्रध्दांजली
नळदुर्ग ,दि.०६
संभाजी नगर (औरंगाबाद) येथील दलित पँथरचे चे नेते माजी मंत्री आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेतृत्व दिवंगत पॅंथर गंगाधर गाडे यांना नळदुर्ग ता.तुळजपू येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व गंगाधर गाडे यांचे नुकतेच संभाजी नगर (औरंगाबाद) येथे निधन झाले..त्यांच्या निधनाबद्दल नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) शहर शाखेच्या वतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युवकांचे प्रेरणास्थान गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या नेतृत्व काळाच्या पडद्याआड आड झाले असून चळवळीत कधिही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे भावपूर्ण शब्दांत कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, नळदुर्ग शहर अध्यक्ष मारुती खारवे, रिपाइंचे राजेंद्र शिंदे, सुभाष गायकवाड (बाभळसुर), सामाजिक कार्यकर्ते बंडु पुदाले,विश्वास रणे, बशीर बागवान, बबलु मकसुद शेख, शकील शेख, शहानवाज कुरेशी,प्रणाल गवळी, सलीम शेख, जेष्ठ कार्यकर्ते नामदेव बनसोडे, मकसुद शेखसह कार्यकर्ते उपस्थित होते.