नळदुर्ग येथील जनसेवा बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार 

वागदरी(एस.के.गायकवाड):
जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर व पैलवान रेवप्पा सोनकांबळे क्रीडा प्रतिष्ठान नळदुर्ग-पुणे यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित इ.१२ वी उत्तीर्ण व पदवी शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे येथे यथोचित सत्कार करण्यात आला.
 
 तथागत भगवान गौतम बुद्ध यांची १२८६ वी  जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त इ.१२ वी उत्तीर्ण व पदवी  पदव्युत्तर  शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा  सत्कार जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था व पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रीडा प्रतिष्ठान नळदुर्ग-पुणे याच्या संयुक्त विद्यमाने टिंगरे नगर पुणे येथील संघमित्रा प्रेरणा बुद्ध विहार बरमासेल येथे करण्यात आला. 
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा गोजरताई जेठीथोर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे सचिव मारुती बनसोडे हे होते.


  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब बनसोडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी कु.ऋतुजा संजय पवार,आराशीन शेख,सुजाता देविदास जाधव,पायल भारत जाधव,सागर जेठीथोर ,सुजीत विजय वंजारी ,ओम शालीक राठोड,आम्रपाली फुलमली,अश्विनी गिरी,अक्षदा देवता चलवादी, कावेरी एलप्पा चलवादी ,सोनाली चलवादी,भरती पवार,ऋतुजा पवार ,सुजय भिंगारदिवे,सागर निसर्गने,राजन निसर्गने,जानवी  फुलमली,जणू फुलमली,गोरसे  श्रीकांत,सिद्धांत सुखे,आदी विद्यार्थ्यांचा पुस्तक, वही व पेन देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.आर.आर.सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वराज्य सोनकांबळे यांनी केले.
 यावेळी नवाडे सर ,सुरेखा विजय वंजारी (अंगणवाडी सेविका व आदर्श किशोरी पुरस्कार प्राप्त),फुलमली इंदूबाई,अरुणा कांगडे ,भिंगारदिवेबाई आदी उपास्थित होते.
 
Top