वागदरी ग्रा.प.च्या वतीने इ.१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
वागदरी(एस.के.गायकवाड) :
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील
इ.१२ वी बोर्ड परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या
इ,१२ बोर्ड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या बोर्ड परिक्षेत वागदरी येथील विविध ठिकाणी काॅलेज मध्ये शिकत असलेले एकुण चौदा विद्यार्थी गुणवत्तापुर्ण मार्क मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.असा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी म्हणून वागदरी ग्रामपंचायतीच्या व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर, उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यानी केले.यावेळी ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार,अंकुल वाघमारे, गुणाबाई बनसोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामसिंग परिहार, रामचंद्र यादव,शंकर धुमाळ, धनाजी बिराजदार, नामदेव यादव, ग्रामसेवक एम.एम.तांबोळी संगणक ऑपरेटर अमित लोंढे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.