नळदुर्ग, दि. २७

नंदगाव ता. तुळजापूर  येथील  ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग व ग्रामनिधी खर्चुन विकास कामे न करता परस्पर लाखो रुपयाचे बिले उचलुन अपहार  केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य शशिकांंत नागिले व ग्रामस्थानी  धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व संबंधिताना देवुन अडीच महिने उलटून गेले. माञ याप्रकरणी अद्याप पर्यंत वरिष्ठानी कारवाई  केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 तुळजापूर तालुक्यातील नंदगाव  ग्रामपंचायत मध्ये भष्ट कारभार झालेला आहे. 15 व्या वित आयोग व ग्रामनिधी या निधीमधून गावामध्ये कामे न करताच परस्पर प्रभारी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बील उचलले असल्याचे नमुद करुन पुढे म्हटले आहे की,  प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेमधील साहित्य देणे , टीसीएल खरेदी करणे , फॉगिंग साहित्य खरेदी करणे, कॅम्पुटर सेट आणि इन्व्हर्टर खरेदी करणे,  शौचालय बांधणे व सुशोभीकरण करणे , डस्टबीन खरेदी करणे,  आदी कामे व साहित्य न पुरवठा करता व साहित्य  आणताच व बांधकाम न करताच  संबंधितांना बिले अदा केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 

ग्रामसेवक व प्रभारी सरपंच याना संबंधितानीथ विचारले असता उडवा उडवीची उत्तर देवुन काम करायच्या आधी बिले उचलण्याची परवानगी असल्याचे सांगितात.   अनेक कामे झाले नाहीत. याची देखील आमच्याकडे सबळ पुरावे आहेत .अगदी लेखी स्वरूपात व व्हिडिओ स्वरूपात असल्याचे म्हटले  आहे. तरी याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक व प्रभारी सरपंचावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अमोल ताकभाते यांच्याशी  संपर्क साधले असता नंदगाव ग्रामपंचायतची चौकशी करुन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठाकडे पाठवले आहे.
 
Top