डॉ आंबेडकर इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्गचा निकाल शंभर टक्के : सर्व विद्यार्थी मेरीट मध्ये उत्तिर्ण

वागदरी (एस.के.गायकवाड):

सम्यक सेवाभावी संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर संचलित डॉ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्गचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी कु श्रध्दा संजय चिमणे यांनी ९८ टक्के ‌गुण घेऊन शाळेतच नव्हे तर नळदुर्ग केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला असून सर्वच विद्यार्थ्यी मेरीट मध्ये उत्तिर्ण होऊन शाळेचे नाव लौकीक केले आहे.
  

  मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून नळदुर्ग येथील डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे.या शाळेतून एकूण २४ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. २४ पैकी २४ विद्यार्थी मेरीटचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असून याच शाळेतील विद्यार्थ्यांनी  श्रध्दा  चिमणे यांनी ९८ ‌टक्के गुण घेऊन  केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र आभिनंदन होत असून शाळेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे यानी  मुख्याध्यापक, शिक्षक आणि उत्तिर्ण विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top