जिवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचा नक्कीच प्रेरणा मिळेल :
डी.टी.गायकवाड
नळदुर्ग येथे १० वी व १२ वी मध्ये गुणवंता प्राप्त विद्यार्थांचा गौरव
नळदुर्ग (एस.के.गायकवाड)
विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे खुप महत्त्व आहे शिक्षण हे आपल्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असून शिक्षण यंत्राचा विद्यार्थांनी पुरेपूर उपयोग करावा शिवाय स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे शिक्षण हे खूप मोठे साधन आहे.शिक्षणा मुळे सामाजिक आणि कौटोंबिक आदर ही वाढतो यासाठी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता विद्यार्थ्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी शिक्षणा विषयी प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचा नक्कीच प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक डॉ.डी.टी.गायकवाड यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात केले .
नळदुर्ग ता.तुळजापूर येथे जनसेवा बहुउदेशिय शिक्षण संस्था नळदुर्ग संचलित पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रिडा प्रतिष्ठान नळदुर्ग पुणे यांच्या वतीने १० वी व १२वी मध्ये उत्तिर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.राज रेवाप्पा सोनकांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गौतम गायकवाड , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक ईश्वर नांगरे , साहित्यिक,एक उत्कृष्ठ निवेदक , पत्रकार , महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे , यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी वऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड आदी होते .
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष पैलवान रेवाप्पा सोनकांबळे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक प्रा.डाॅ.गौतम गायकवाड (आंबेजोगाई) यांना फेटा, पुष्पहार पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन संस्थेच्या वतीने सेवा निवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी गुरुजी यांच्या हस्ते "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्य स्तरीय उत्कृष्ट लेखक " पुरस्काराने तर सामाजिक कार्यकर्ते बंडु पुदाले (नळदुर्ग) याना उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी सन्मान पत्राचे वाचण केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
इ.१० वी व १२ वी.उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व वाचनीय पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ.गौतम गायकवाड,भैरवनाथ कानडे.साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, शिवाजी वराडे,सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड आदींची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
याप्रसंगी बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश गायकवाड,पंचायत समिती उमरगा येथील सांखिकी विस्तार अधिकारी राहुल सोनकांबळे,सुधाकर सोनकांबळे,धर्मा सोनकांबळे ,वैशाली माने पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, बालीका सोनकांबळे, सचिन कांबळे सह विद्यार्थी,महिला युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी तर शेवटी आभार कैलास गवळी यांनी मानले.