नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच नळदुर्ग शहरात जल्लोष
नरेंद्र मोदी यांनी हॕट्रीक साधत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर नळदुर्ग शहरातील अनेक भागात दिवाळीप्रमाणे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शहरातील मराठा गल्ली, ब्राम्हण गल्ली, व्यास नगर, भवानी नगर, शास्त्री चौक येथे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहर भाजपा कार्यालय, ऐतिहासिक चावडी चौक, जय भवानी चौक व बसस्थानक समोरील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक येथे घोषणाबजी करत फटाके फोडले, गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठाई भरवली.
यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगरसेवक शहराध्यक्ष धिमाजी घुगे, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, माजी उपाध्यक्ष अजय देशपांडे, सागर हजारे,गणेश मोरडे, अक्षय भोई, विशाल डुकरे शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके, दीपक घोडके, राष्ट्रवादी काॕग्रेसचे अजित झुनैदी, मनसेचे प्रमोद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.