पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी नंतर वागदरीत जल्लोष
वागदरी, दि. १० एस.के.गायकवाड
सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक निकाल लागले असले तरी ही भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने दि.०९ जून २०२४ रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीनंतर वागदरी ता.तुळजापूर येथे भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) रिपाइं (आठवले) सह महायुतीच्या कार्यकर्रत्यानी फटाक्यांची आतिषबाजी करून हालगीच्या कडकडाटात गावातून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.