विनायक अहंकारी यांच्या निवास्थानी  शिवाराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा 
नळदुर्ग, दि.६ .
 शहरातील माजी नगरसेवक तथा स्वा. सावरकर प्रतिष्ठाणचे प्रमुख विनायक अहंकारी यांच्या निवास्थानी गुरुवार रोजी  शिवाराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

दि. ६ जून  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी दुग्धअभिषेक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय बताले, माजी उपाध्यक्ष शरद बागल, माजी नगरसेवक अमृत पुदाले, महालिंग स्वामी, बसवराज धरणे,  पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे,शिवसेनेचे सरदारसिंह ठाकूर, भाजपाचे शहर अध्यक्ष धिमाजी घुगे,विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर, समीर मोरे,भाजयुवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, सागर हजारे, पत्रकार भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,अमर भाळे,आंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव,  राजेंद्र महाबोले, नंदकुमार जोशी, शिवराम मोटे, प्रमोद जोशी,किशोर जोशी, अरुण जोशी, तानाजी नागणे, शिवाजी नागणे, अनिल गुरव, नारायण दोपारे,उमेश जाधव, संतोष जाधव,उमेश नाईक,सचिन भूमकर,राजकुमार वैद्य, अजित देशपांडे,प्रदीप ग्रामोपाध्याय,अमित भूमकर, संदीप वैद्य, ज्ञानेश्वर केसकर,रोहित वाले, अनिल पाटील,मारुती घोडके, बलदेव ठाकूर,अनिल कुलकर्णी, मयूर जोशी,सुहास पुराणिक, बंडोपंत कसेकर आदी उपस्थित होते.



 
Top