वागदरी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार 

वागदरी , दि.०६

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार येथील ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने करण्यात आला.

  मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या  इ.१० बोर्ड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार  ग्रामपंचायत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले. 


  या प्रसंगी सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर,उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव, ग्रामसेवक एम. एम.तांबोळी ,ग्रा.प.सदस्या मिनाक्षी बिराजदार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.१० वी बोर्ड परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पहार पुष्पगुच्छ व शालेय साहित्य देऊन  सत्कार करण्यात आला..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यानी केले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष तथा  निवृत्त पोलिस हवालदार संदिपान वाघमारे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते मोहनसिंग (दादा) चव्हाण, नागनाथ जाधव, सुदामा वचणे,महादेव बिराजदार,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,बाळु पवार, बाळकृष्ण बिराजदार,दत्ता पाटील, चरणसिंग परिहार,ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार चव्हाण,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top