नळदुर्ग : जि.प.केंद्रिय शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पुस्तके वाटप
नळदुर्ग ,दि. १६
येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवार (दि.१५) रोजी विद्यार्थ्यांचे पुष्प, फुगे देवून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजनावेळी गोड पदार्थ देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक भास्कर मस्के, शिक्षक बिलाल सौदागर, वंदना चौधरी, जयश्री धुमाळ, सुरेखा मोरे पालक प्रतिनिधी रवी सुरवसे, निरज डुकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.