राष्ट्रवादीचे नेते जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नळदुर्ग, दि.२६


महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसा निमित्त नळदुर्ग येथे बुधवार दि- २६ जून रोजी शेतकरी मेळाव्यासह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित  करण्यात आले आहे.

 बुधवारी सायंकाळी ५ वाजता महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांचा वाढदिवस नळदुर्ग येथील बीके फंक्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात व विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जनता सध्या अशोक जगदाळे यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे. अशोक जगदाळे यांनी राजकारणाबरोबरच समाजकार्यही मोठ्या प्रमाणात केले आहे. मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी गरीब मुला-मुलींचे विवाह करून दिले आहेत. त्याचबरोबर हजारो महिलांना मोफत देवदर्शन घडवून आणण्याचे काम अशोक जगदाळे यांनी केले आहे. तालुक्यात पाणीटंचाईच्या काळात अशोक जगदाळे यांनी अनेक गावातील नागरिकांना टँकरव्दारे मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावात फिरता दवाखाना सुरू करून हजारो नागरिकांवर मोफत उपचार केले आहेत.
  

 तुळजापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना अन्नधान्यासह बी-बियाणे व खतांचे मोफत वाटप करण्याचे कामही अशोक जगदाळे यांनी केले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग शहरासह परिसरातील गावातील नागरिकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. म्हणूनच आज अशोक जगदाळे यांच्याकडे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक एक आदर्श व लोककल्याणकारी नेता म्हणून पाहिले जात आहे.
 
Top