महाविकास आघाडीचे प्रबळ उमेदवार अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचंड मताने निवडून आणण्याचे कार्यकर्त्यांनी केले निर्धार

नळदुर्ग,दि. २७

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसाच्या  निमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर विधानसभा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
   

नळदुर्ग येथे दि. 26 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहून अशोक जगदाळे यांना तुळजापूर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून पाठवण्याचा मनोगत व्यक्त केले. 
 
 प्रारंभी शेतकरी मेळाव्यास तुळजापूर विकसनशील शेतकरी मार्गदर्शक गुंडू पवार, प्रगतीशील शेतकरी सत्यवान सुरवसे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तुळजापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सोहळ्यात अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, शिवाजीराव मोरे, यांनी मार्गदर्शन करून अशोक जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी. लोकसभा निवडणुकी सारखे आपण एकदिलाने एकमताने ही निवडणूक लढून अशोक जगदाळे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करू व वाढदिवसाची भेट देऊ असा निर्धार व्यक्त केला. 

यावेळी तुळजापूर मतदार संघातील रखडलेल्या विकास कामास विद्यमान आमदार व राज्यसरकार हे जिमेदार आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही म्हटले. महायुतीकडून तुळजापूर मतदार संघात सत्ताधारी पक्षास तोडीस तोड उत्तर देणारा उमेदवार एक प्रबळ दावेदार म्हणून अशोक जगदाळे यांच्या शिवाय दुसरा उमेदवार राहूच शकत नाही. तसेच यावेळी विरोधी मताची मतविभागणी टाळण्याकरिता एकास एक उमेदवार देऊन प्रचंड ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. या सोहळ्यात अशोक जगदाळे यांच्या नावावर सर्व संमत्तीने शिक्का मोर्तब करण्यात येवून महाविकास आघाडीत जागा कोणत्या पक्षास सुटेल त्यानुसार जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे मत ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

 कमलाकर चव्हाण, शहबाज काझी, मुस्ताक कुरेशी, तीती शेख, नितीन कासार, महालिंग स्वामी, अमृत पुदाले, किशोर नळदुर्गकर, विनायक अंहकारी, दत्ताञ्य कोरे,संजय जाधव, मुनीर शेख, मुकुंद नाईक, संतोष पुदाले,  महबूब शेख, शिवाजी गायकवाड, शिवाजीराव मोरे, बंकट बेडगे ,   नवाज काझी, सरदारसिंग ठाकूर, गोविंद देवकर, होर्टीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले, कृष्णात मोरे, , डॉ बालाजी जाधव, विलास पुदाले, कनगऱ्याचे सरपंच मधुकर गंगणे, उपसरपंच सुरज इंगळे, युवराज पिंपळे , माजी सरपंच अमोल मस्के काटीचे सरपंच सुजित हंगरगेकर ‌, काटगावचे दीपक माळी, शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके, अबेद इनामदार,हलीम पटेल, रमेश जाधव , म्हंतेश पाटील
,ताजोद्दिन शेख,संजय बेडगे, मुन्ना शेख,अमित शेंडगे, शाम कनकधर,,ओम बागल, आदीसह कार्यकर्ते
उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुणधती शेटे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर पोतदार , नवल जाधव , प्रवीण चव्हाण, ओम बागल, बंटी मुळे, उदय भुमकर, विशाल जगदाळे, आदीनी पुढाकार घेतले. 
 
Top