राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा;मनसेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला इशारा
नळदुर्ग,दि.२८
सोलापूर - हैद्राबाद या महामार्गावरील जळकोट, नळदुर्ग बायपास, अणदूर (ता. तुळजापूर) या गावांमधून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र 65 याचे काम गेल्या 12 वर्षांपासून संथ गतीने आणि अर्धवट ठेवून ठेकेदार कंपनी,व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत,
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि जे सुविधा पाहिजे ते झाले नाहीत उड्डाणपुलाचे काम तर प्रत्येक ठिकाणी अर्धवटच आहेत. तसेच नळदुर्ग बायपासचे काम अंत्यन्त संथ गतीने चालू आहे.मोठी लोकसंख्या असलेल्या जळकोट गाव आहे या ठिकाणी ही अनेक काम निकृष्ट दर्जाचे झाले आहेत दररोज हजारो नागरिकांना हा महामार्ग ओलांडून जावे लागते गावात वाहनांचा वेग कमी व्हावे यासाठी केवळ एक गतिरोधकाचा वापर केला आहे यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे गतिरोधकाची संख्या वाढवणे गरजेचे आहे तसेच सर्विस रोड आणि मुख्य महामार्ग यामध्ये बॅरिगेटिंग अथवा जाळी बसविणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सर्विस रोड, संभाजीनगर भागात जाणारा मुख्य रस्ता ते सर्विस रोड आणि गावातून आलियाबाद कडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईटचे काम करणे आणि सदर महामार्गावरील ठीक ठिकाणी गतिरोधकावर थर्मो प्लास्टिक (पांढरेपट्टे) चे काम, सर्व सूचनाफलक तात्काळ करण्यात यावे.
व तसेच अणदूर येथील उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाला एक नवीन बोगदा होणे गरजेचे आहे. अणदूर गाव हे एक मोठे गाव आहे या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान असून शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय बँक, बाजारपेठ आहे,महामार्गाच्या दोन्ही बाजूने वसलेल्या या गावामध्ये जाण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना खूप लांबून जावं लागत आहे व वयोवृद्ध माणसाला ही पटकन गावातील दवाखान्यात जाता येत नाही उड्डाणपुलाला फिरून जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांची खूप मोठी कसरत होत आहे.
या सर्व बाबीकडे त्वरित लक्ष घालून जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सर्व काम त्वरित करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात असा इशारा मनसे पदाधिका-यांनी संबंधीत विभागाला दिला आहे,
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,तालुका सरचिटणीस गणेश पाटील, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, अणदूर शाखाध्यक्ष सोमेश्वर आलुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.