ॲड तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव पवार यांचे निधन
जळकोट ,दि. ३०
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवाशी ( मूळ निवासी आलियाबाद तांडा ) सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अँड बाबुराव रामचंद्र पवार वय 61 वर्षे यांचे रविवार दि. 30 जून 2024 रोजी सकाळी 09 वाजत सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
बाबुराव पवार यांनी लातूर जिल्हयात जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम सुरू केले. त्यांच्या सेवाकाळात पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख सेवानिवृत्तीवेळी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या सेवाकाळातच कायदयाचे शिक्षण ( LLB ) पुर्ण केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर विधिज्ञ म्हणून तुळजापूर, धाराशिव न्यायालयातून न्यायदानाचे कार्य करत होते. अजातशत्रू, मितभाषी, सर्वांशी आपुलकिने वागणारे, अशा या बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाची अखेर झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात वडिल, चार भाऊ, भावजया, पत्नी, दोन मुली, जावाई, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. दलितमित्र पुरस्कारप्राप्त सरपंच तथा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटचे संस्थापक दिवंगत मोतीराम नंदू चव्हाण यांचे जावई तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांचे ते भावजी होत.