माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून पवार कुटूबिंयाचे सांंत्वन
विधीज्ञ कै.बाबुराव रामचंद्र पवार यांच्या कुटूंबियाची माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दि. 2 जुलै रोजी आलियाबाद ता. तुळजापूर येथे भेट घेऊन सांत्वन केले.
याप्रसंगी पवार कुटूंबियासमवेत निवृत्त नायब तहसीलदार माणिकराव मोतीराम चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश मोतीराम चव्हाण, आलियाबाद गावाचे सरपंच सुर्यकांत मोतीराम चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, कुलस्वामीनी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक,प्राचार्य संतोष चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी राठोड, रामतीर्थ तांड्याचे सरपंच लक्ष्मण राठोड आदींसह आलियाबाद तांडा, रामतीर्थ तांडा, जळकोट, नळदुर्ग, अणदूर आदि गावातील नातेवाईक, नागरिक उपस्थित होते.