मानेवाडी शाळेप्रकरणी चौकशी न करणाऱ्या संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची अन्याय अत्याचार विरोधी समितीची मागणी
नळदुर्ग, दि.०२
मानेवाडी ता. तुळजापूर जि.प.प्राथमिक शाळेची चौकशी न करणाऱ्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमनणा-या तुळजापूर गटशिक्षण कार्यालयातील विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी अन्याय अत्याचार विरोधी समिती अल्पसंख्याकचे अध्यक्ष सय्यद अजीज फजल यांनी धाराशिव जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह संबधीताकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे मी दि.11 डिसेंबर 2023 रोजी माहिती आधिकारात माहिती मागितली होती. माञ माहिती उपलब्ध नाही अशी लेखी देणाऱ्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.धाराशिव यांचे पत्र क्र जाक्र/जिपघा/शिक्षण/आ-9/163-387/2024 दि.08/02/2024 या रोजीचे पत्र देऊन देखील संबंधित विस्तार अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कोणतेही चौकशी केलेली नाही असे सांगून प्रत्यक्ष गटशिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन संबंधितावर कारवाई करण्याची विनंती केली. तरीदेखील वरील चौकशी अधिकारी यांनी न जुमानता व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. गटशिक्षण कार्यालयाने संबंधितावरील चौकशी अधिकाऱ्यांना चार दिवसात अहवाल सादर करण्याचे दोन वेळेस पत्र देऊन देखील संबंधिताने कोणतीही चौकशी केलेली नाही. यावरून संबंधितानी आर्थिक फायद्यासाठी चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप केले आहे. चौकशी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची किती प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे टाळाटाळ केले व त्याच्याकडे किती चौकशी प्रलंबित आहेत, याचीही चौकशीची मागणी केली आहे. संबंधित अधिकारी हे वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करता केराची टोपली दाखवत सर्व सामान्य जनतेसोबत कसे वागत असतील यावरून दिसून येत आहे. तरी वरील अधिकाऱ्याच्या विरोधात वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे, विहित मुदतीत चौकशी न करणे, शासकीय कामात हलगर्जीपणा करणे, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रत शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आली आहे.