पोलीस निरीक्षक जाधव यांचा नळदुर्ग येथे सत्कार 

वागदरी(एस.के.गायकवाड) :

बिड जिल्ह्यातील शिरशाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद जाधव यांचा डाॅ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्ग ता.तुळजपूर येथे यथोचित सत्कार करण्यात आला.

  पोलिस निरीक्षक आनंद जाधव हे तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तुपाचे) येथील मुळ रहिवासी असून  त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात काही काळ पोलीस शिपाई म्हणून काम करत  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एसी.) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल होताच त्यांना नक्षलवादी परिसरात गडचिरोली येथे दिवटी देण्यात आली.तब्बल चार वर्षे यशस्वीरीत्या आपले कर्तव्य बजावून सध्या बिड जिल्ह्यातील शिरशाळा पोलीस ठाणें ता.परळी येथे पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाले असून त्यांनी नुकतच सम्यक सेवाभावी संस्था नळदुर्ग संचलित डॉ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्ग येथे सदिच्छा भेट दिली असता शाळेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे व प्रा.भगवान चिमणे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


  या वेळी संपादक तथा बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष तथा रिपाइं (आठवले) युवा आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइं चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागीले, अरविंद लोखंडे, शंकर भाळे आदी उपस्थित होते.
 
Top