जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक दुपारगुडे यांचे निधन
नळदुर्ग(प्रतिनिधी) :
निलेगाव ता.तुळजापूर येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कुंडलिक गोविंद दुपारगुडे यांचे दि.१६जून २०२४ रोजी रात्री १०.वा.सुमारास व्रध्दापकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांचे वय ९५ वर्षे होते.त्यांच्या पश्चात तिन मुले,तिन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.दि.१७ जून २०२४ रोजी दुपारी ठिक २.३० वा.दरम्यान निलेगाव येथे बौद्ध धम्म पध्दतीने त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित शोकाकुल जनसमुदायानी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.