राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गटांना 50 लाखाचे कर्ज वितरण
नळदुर्ग ,दि.२९
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नळदुर्ग शहरातील सहा बचत गट असे मिळुन एकूण 50 लाखाचे कर्ज वितरण दि. 29 जुलै रोजी नगर परिषदेत करण्यात आले.
दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचे मार्गदर्शननुसार शहरातील महिला बचत गटाला विविध व्यवसाय करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे मार्फत जय मल्हार बचत गटाला 10 लक्ष, कल्पराज महिला बचत गटाला 10 लक्ष, जिजामाता महिला बचत गटाला 10 लक्ष, पंचशील महिला बचत गटाला 10, भिमाई महिला बचत गटाला 5 लक्ष आणि विजया लक्ष्मी महिला बचत गटाला 5 लक्ष असे एकूण 50 लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
सदरच्या कर्जातून बचत गट छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित झाले आहेत व सदर व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व राहणीमानाचा दर्जा चांगल्या प्रकारे साधण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदर कर्ज मिळण्यासाठी नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड, समुदाय संघटिका रानुबाई सपकाळ, शहरस्तरीय संघाचे अध्यक्ष कल्पना गायकवाड, सचिव जिजाबाई जाधव यांच्या प्रयत्नातून आणि बँकेचे व्यवस्थापक साळुंके, लोन मॅनेजर खुशाल राऊत, व गणेश यांच्या सहकार्यतून गटाला कर्ज वितरण झाले. कर्ज वितरणासाठी उपस्थित नगरपरिषदेचे व बँकेचे अधिकरी कर्मचारी आणि शहर स्तराचे व बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.