राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे  सरचिटणीस  आदित्य गोरे यांंची येडोळा गावास भेट

नळदुर्ग ,दि.२८

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे  सरचिटणीस  आदित्य गोरे यांनी आढावा बैठक निमित्त भेट दिली. यावेळी त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आले.


 येडोळा गांवचे माजी  सरपंच पद्माकर पाटील,  ग्रामपंचायत सदस्य  उत्तम जाधव , प्रगतीशील शेतकरी  दत्तात्रय जाधव व धाराशिव विद्यार्थी  काँग्रेस जिल्हा अध्यक्ष  ज्ञानेश्वर निंबाळकर यांचा सत्कार येडोळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस  पक्षाच्या वतीने  रवि पाटील, युवा कार्यकर्ते प्रसाद जाधव, शाम जाधव, ओंकार पाटील, आदित्य पाटील, हेमंत पाटील, समर्थ पाटील, संकल्प चव्हाण, गोवर्धन लोंढे, अभिजित चव्हाण , गौस पटेल अमोल जाधव यानी केले.


याप्रसंगी आदित्य गोरे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना तुळजापूर विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकुडून माजी परिवहन मंत्री जीवनराव गोरे  हे इच्छुक आहेत.  विकासासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top