डॉ. सुभाष राठोड यांची प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल सन्मान
नळदुर्ग,दि.२८
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांचे विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती केल्याने तुळजापूर तालुका बंजारा समाज व मित्रपरिवाराकडून राठोड यांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी तुळजापूर तालुका बंजारा समाजाच्यावतीने पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरीश जाधव , संजय राठोड , रामतीर्थ ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण राठोड, उपसरपंच तारू पवार , आलियाबाद ग्रामपंचायतचे उपसरपंच अमृता चव्हाण , माजी उपसरपंच सूर्यकांत राठोड , एम पी राठोड , प्रा. दीपक जगदाळे , महाविद्यालयाचे अधीक्षक प्रा. धनंजय पाटील,कर्मचारी माणिक राठोडसह मित्र परिवारांनी डॉ सुभाष राठोड यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .