पर्यटक व इतिहास प्रेमीतुन युनिटी कंपनीचे कौतुक;   किल्ला पुन्हा एकदा  जतन व संगोपनाकरिता युनिटीस देण्याची मागणी

नळदुर्ग , दि.१२ :

युनिटी कंपनीने  नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात केलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे हा किल्ला सर्वत्र  रोल माॕडेल म्हणुन पर्यटक व इतिहास प्रेमी नागरिकातुन उल्लेख करुन युनिटी कंपनीचे कौतुक केले जात आहे.या व इतर सर्व बाबीचा विचार करता शासनाने  भविष्यात हा किल्ला पुन्हा एकदा  जतन व संगोपनाकरिता युनिटी कंपनीस देण्याची मागणी केली जात आहे.

 ऐतिहासिक भुईकोट किल्ला प्रेक्षणीय व प्रेरणादायी आहे. केंद्र व राज्यशासनाने याप्रकरणी लक्ष घालणे गरजेचे असून येथे ऐतिहासिक माहिती उपलब्ध करुन दिल्यास व त्या माहितीचे सादरीकरणाबाबत प्रयत्न झाल्यास हा किल्ला निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे किल्ल्यास भेटी देणा-या पर्यटक व इतिहास अभ्यासकांनी आपले अभिप्राय नोंदविले आहे.
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यास  प्रशासनातील अति महत्त्वाचे व्यक्ती व इतिहास अभ्यासक, पर्यटकांनी सर्वाधिक भेटी देवून युनिट मल्टिकॉन कंपनीने किल्ल्याचे सुशोभिकरण करुन योग्यप्रकारे जतन केल्याबद्दल अनेकांनी चांगल्याप्रकारे अभिप्राय दिले आहेत. नळदुर्गचा प्राचीन व ऐतिहासिक किल्ला राज्यशासनाच्या प्राचीन स्मारकाचे जतन व संवर्धन योजनेंतर्गत सोलापूरच्या युनिटी कंपनीने करारान्वये घेतला आणि किल्ल्याचे संपूर्ण रुपडे बदलून गेले.

 नळदुर्ग किल्ल्यास एरवी कधीतरी भेट देणारे पर्यटक  मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. 
उस्मानाबाद जिल्हाचे मुख्य न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल, इतिहासाचे अभ्यासक व पुणे ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे, सचिव मिलिंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील अधिकारी तसेच किसान आर्मी, वॉटर आर्मी व लँड आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी व व्यक्तींनी भेटी देऊन किल्ल्याची पाहणी केली आहे.
ओमप्रकाश जयस्वाल प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी आपल्या अभिप्रायामध्ये म्हटले आहे की, किल्ल्यातील झालेल्या परिवर्तनाची पाहणी केल्यानंतर वास्तुकलेचे अप्रतिम व जिवंत उदाहरण जाणवले. युनिटी मल्टीकॉन ने किल्यात विविध विकास कामे करून किल्ला संवर्धन करण्याचा भरपूर प्रयत्न केल्याचे जाणवले. भविष्यात या वास्तुचे उतकृष्टपणे जपणूक व संवर्धन होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


इतिहास अभ्यासक विवेक देशपांडे यांनी म्हटले आहे की, परंडा, औसा, धर्मापुरी, उदगीर हे किल्ले अभ्यासत नळदुर्गच्या किल्ल्यात आलो असता मन प्रसन्न झाले. शासनामार्फत चालु असलेल्या किल्ले जतन व संगोपण मोहीमेचा भाग म्हणून नळदुर्ग किल्ल्याची सध्या परिस्थिती चांगली आहे. वर उल्लेख केलेल्या इतर किल्याची अवस्था मात्र  वेगळी आहे. नळदुर्ग किल्ल्याची तुलना केल्यास नळदुर्ग किल्ल्याच्या धरतीवरच राज्यातील इतर किल्यांचा विकास करणे गरजेचे आहे.  मंत्रालय कक्ष अधिकारी महाराष्ट्र वैभव संगोपण योजना शासनाने सुरू केली. राज्यातील प्राचीन स्मारकाच्या जतन व संवर्धनासाठी खर्च करण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व संस्थाना संधी देण्यासाठी सुरू केली. त्यानुसार युनिटी कंपनीने हा किल्ला घेतला. या किल्ल्यातील स्थापत्य कौशल्य हे अद्वितीय असून पर्यटकांना सोई सुविधा उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार किल्ल्यात गाईड व माहिती फलक वाढविण्याचे सांगितले आहे. तर प्रफुल्ल कदम यांनी केंद्र व राज्यशासनाने या प्रकरणी लक्ष घालणे गरजेचे असून ऐतीहासिक माहिती उपलब्ध करणे आणि त्या माहितीचे सादरीकरण या बाबत किल्ल्यामध्ये प्रयत्न झाल्यास हा किल्ला प्रेक्षणीय बरोबरच प्रेरणादायी ठरेल, असे म्हटले आहे.
 
Top