तुळजापूर : आलियाबाद येथे कै.अँड बाबुराव पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त स्मशानभूमीत वृक्षारोपण
जळकोट, दि.१८
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे कै.अँड बाबुराव पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. अँड पवार यांनी हयात असताना संकल्प केला होता.त्याचे संकल्प त्यांचा मुलगा अभिषेक पवार यांनी 51 झाडे लावून पूर्ण केला.
यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, रामतीर्थ चे सरपंच लक्ष्मण राठोड,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, पोलीस पाटील, शिवाजी चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष नाईक, सुभाष पवार, अभिषेक पवार,ग्रामपंचायत सदस्य पती माणिक राठोड, यशवंत राठोड, माजी मुख्याध्यापक महादेव राठोड, शिवाजी चव्हाण, व्यंकट राठोड, बाबुराव राठोड,बबन चव्हाण, अभिजित चव्हाण, मधुकर राठोड, अभिषेक राठोड, राम पवार, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.