दलित मित्र पुरस्कार प्राप्त स्वर्गीय मोतीराम चव्हाण यांची पुण्यतिथी विविध  कार्यक्रमाने साजरी

जळकोट ,दि. २२:

तुळजापूर तालुक्यातील आलियाबादचे दलित मित्र पुरस्कार प्राप्त स्वर्गीय मोतीराम चव्हाण यांची पुण्यतिथी विविध   कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

सोमवार दि. 22 जुलै  रोजी आलियाबाद ता. तुळजापूर येथे स्वर्गीय मोतीराम चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कुलस्वामिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व तसेच राजश्री शाहू कॉलेजच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी सभापती तथा जिल्हा परिषद‌ सदस्य प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील,माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण , जळकोटचे सरपंच गजेंद्र कदम,आलियाबादचे सरपंच सुर्यकांत चव्हाण, रामतीर्थ सरपंच लक्ष्मण राठोड, उपसरपंच अमृता चव्हाण, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ‌जिल्हा सरचिटणीस महेश कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन कदम, अमोल चव्हाण,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील, राजकुमार पाटील, दत्तात्रय चुंगे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, कल्याणी साखरे , पिंटू कागे,विजय मोरे, पंडीत कदम, शंकर वाडीकर, लहू कदम, बबलू किलजे ‌,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक, नेमिनाथ चव्हाण वाय.के.चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत राठोड ,माणिक राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड,मनोज चव्हाण, शंकर चव्हाण, नामदेव चव्हाण , यशवंत राठोड,दामाजी राठोड, धनू पाटील, अमोल आलुरे, पत्रकार मेघराज किलजे यांच्या सह कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य संतोष चव्हाण , इंदिरा गांधी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विनायक राठोड ,मुगळे, यांच्यासह कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top