जिल्हा परिषद शाळेने पालक मेळाव्यातून साधला पालकांशी संवाद
मुरुम, ता. उमरगा, दि. २१ :
येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी दि.२० रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांदपाशा गवंडी, उपाध्यक्ष राचप्पा दुर्गे, पालक दत्ताभाऊ हुळमुजगे उपस्थित होते. इंजिनियर प्रदीप वेदपाठक, दत्ताभाऊ हुळमुजगे, दयानंद साखरे, जाफर मोमीन आदींनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयावर पायाभूत बाबी विचारात घेऊन प्रशालेतील सर्व शिक्षक बांधवांनी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्व पालकांनी घेतली. याप्रसंगी विजयकुमार देशमाने यांनी प्रशालेत शैक्षणिक उपक्रमासोबत गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक-बालक-पालक यांच्या त्रिसूत्री समन्वयातून प्रयत्न करण्याचे पालक बैठकीत एकमताने ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर तर आभार अनिषा फुगटे यांनी मानले.
माजी केंद्रप्रमुख कमलाकर मोटे, राजकुमार धुमरे, निलेश महामुनी, प्रकाश च्यारे, आयुब नदाफ, सीताबाई शिंदे, गंगाबाई मोरखंडे, कुमार स्वामी, पूजा सराफ, रघुनाथ बनसोडे, रशीदमिया नदाफ, प्रिया वेदपाठक, लता कोकणे, अर्चना शिंदे, सैन जाधव, भीमा चव्हाण आदी पालक उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांदपाशा गवंडी यांनी वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी विद्यार्थांशी संवाद साधला. प्रशालेतील संतोष कडगंचे, हरिभाऊ माकणे, मोहन राठोड, सुभाष व्हटकर, संगीता माने, राजू पवार, संगिता घुले, निर्मला परीट आदींनी पुढाकार घेतला.