राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एक वृक्ष आईच्या नावे मोहिम
मुरूम, ता. उमरगा, दि. १९ :
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एक वृक्ष आईच्या नावे या मोहिमे अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत महाविद्यालयातील परिसर, गणेशनगर व नाईकनगर (दत्तक गाव) येथे विविध प्रकारच्या जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण गुरुवारी (ता.१८) रोजी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. किरण राजपूत, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. मुकूंद धुळेकर, डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. विनायक रासुरे, डॉ. विलास खडके, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. राम बजगिरे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रविंद्र आंळगे, डॉ. रमेश आडे, डॉ. सोमनाथ बिरादार, प्रा. दयानंद बिराजदार, अजिंक्य राठोड, इसाली चाऊस, श्रावण कोकणे, दिलीप घाटे आदिंनी पुढाकार घेतला.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण करताना चंद्रकांत बिराजदार, सतिश शेळके, प्रतापसिंग राजपूत व अन्य.