नळदुर्ग : हुतात्मा स्मारक येथे आधार कार्ड आपडेट कॅम्प सुरु
नळदुर्ग, दि.१७ :
मंडळ विभाग नळदुर्ग अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना , इंदिरा गांधी योजना अंतर्गत मदत मिळत असलेल्या लाभार्थी यांच्यासाठी व आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी दि. 18 व 19 जुलै 2024 रोजी हुतात्मा स्मारक नळदुर्ग येथे सकाळी दहा ते सांयकांळी पाच पर्यंत आपले आधार कार्ड आपडेट कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. तरी लाभार्थ्यांनी स्वतः आधार कार्ड व मोबाईल नंबर घेऊन सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत हजर राहावे असे आवाहन मंडळ अधिकारी जयंत गायकवाड व तलाठी विश्वास वायचळ यांनी केले आहे.
मंगळवार दि.१६ रोजी मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी विश्वास वायचळ, रफीक फुलारी यांच्या उपस्थितीत शिबीराची सुरवात करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला.