आरोग्य विषयक दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी दिला संदेश
नळदुर्ग,दि.१७
जय हरी विठ्ठल, स्वच्छ भारत सुंदर भारत, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या या जयघोषामध्ये अवघी नळदुर्ग नगरी दुमदुमली.
श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात स्वच्छते विषयी संदेश देणारे फलक हातात घेऊन, आषाढी एकादशीनिमित्त नळदुर्ग शहरामध्ये दिंडी काढली. दिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक व तसेच काही पालकांनी सहभाग नोंदवला. उत्साही वातावरणामध्ये दिंडी संपन्न झाली.
यावेळी शिलाबई कौरव मॅडम, सरिता कुलकर्णी , सुचिता पाटील , झेबा बेग , सुजाता स्वामी , विद्या विभुते , अनिता पावले , प्रेरणा सुरवसे , जयसिंग राठोड , मुख्याध्यापक अभिजीतसिंग खारे आदी उपस्थित होते.