पत्रकार अरुण लोखंडे यांना पितृशोक
वागदरी ,दि.१६
जळकोट ता.तुळजापूर येथिल नारायण तुकाराम लोखंडे यांचे दि.१६ जुलै रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवा आघाडी धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांचे वडील नारायण तुकाराम लोखंडे यांचे आज दि.१६ जुलै रोजी सकाळी ठीक १०.२० मि.वाजण्याच्या दरम्यान जळकोट ता.तुळजापूर येथे अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात तिन मुले, सुना, नातवंडे पुतणे भावंडे असा मोठा परिवार आहे.
दि.१६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा.दरम्यान त्यांच्या पार्थिवावर जळकोट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.