नळदुर्ग बसस्थानक चिखलाच्या विळख्यात ;  प्रवाशातुन संताप,  डांबरीकरणासह  सोयी सुविधा उपलब्धतेसाठी  पत्रकार संघाचे निवेदन 

नळदुर्ग,दि.१६: एस.के.गायकवाड


 येथील बसस्थानकाच्या आवारात  पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून चिखल तुडवीत प्रवासाना बसमध्ये चढ उतार करावी लागत‌ आहे. त्यामुळे बसमध्ये ही चिखलाने घाण होऊन प्रवाशाच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण होतो आहे.  बसस्थानक परिसरात डांबरीकरणा सह इतर सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने करण्यात येत आहे.
  
प्रवासी राज्य दिनानिमित्त दि.१५ जुलै  रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगार प्रमुखांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून त्यात पुढे म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे शहर मुंबई  हैदराबाद व्हाया सोलापूर नळदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर वसलेले असून या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे.त्यामुळे पावसाळ्यात हा किल्ला पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी या बसस्थानकावर असते शिवाय अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज, तुळजापूर येथील आई तुळजाभवानी,व नळदुर्ग-अणदूर येथील खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविकांची मोठी गर्दी या बस्नकावर सतत असते.  चिखल पाण्यातुन मार्ग काढत प्रवाशी दमछाक करत बसमध्ये चढउतार करीत  आहेत. अशी परिस्थिती दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होते. तरी परिवहन महामंडळाने नळदुर्ग बसस्थानक परिसरात डांबरीकरण करावे,या बसस्थानकात कायम पोलीस मदत केंद्र कॅबिनची सोय करावी, जेणेकरून शालेय व महाविद्यालयीन मुलींची छेड छाड होणार नाही  आणि चोरीचे प्रमाण ही कमी होईल,चोविस तास वहातुक नियंत्रक नियुक्त करण्यात यावे, बसस्थानकात सिसिटीव्ही कॅमेरा बसवावा , कंट्रोल केबिनमध्ये इन्व्हर्टरची सोय करावी, बसस्थानकात फलाट क्रमांकानुसार बसेस थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी, बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला प्रवेश द्वार करावे आदीसह विविध मागण्यांचे निवेदन तुळजापूर आगार प्रमुखांना देण्यात आले, 

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरचे अध्यक्ष अरुण लोखंडे, उपाध्यक्ष किशोर धुमाळ, मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख, इरफान काझी,शामकांत नागीले,एस.के.गायकवाड, विजय पिसे, सुनील माळगे,संजय पिसे आदींच्या सह्या आहेत.
 
Top