केसर जवळगा येथे सर्प दंशाने शेतकरी महिलेचा मृत्यु
मुरूम दि.१४
शेतात काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने 36 वर्षीय शेतकरी महिलेचा शनिवारी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे सदरील घटना केसरजवळगा शिवारात घडली आहे.
केसर जवळगा येथील शेतकरी महिला निर्मला हणमंत लकडे वय 36 ह्या शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास शेतात गेल्या होत्या. शेतातील ज्वारीचे कडबा काढताना सापाने दंश केल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे. मुरूम येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ महेश बेंबळगे,डॉ सिफणा तांबोळी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले सांयकाळी 4 च्या सुमारास केसरजवळगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.