लाडक्या बहिणीच्या मदतीला बोळेगाव ग्रामपंचायतीचा पुढाकार
वागदरी,दि.१४ एस.के.गायकवाड
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेचा गावातील लाभार्थी महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून महिलांचे ॲनलाईन व आॕफलाईन अर्ज भरून घेतले जात आहे.
गावात लाडकी बहिण योजने पासुन कोणीही वंचित राहू नये म्हणून ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सरपंच विलास पाटील , ग्रामसेवक एल.बी.कांबळे,
आरोग्य सेवक विरभद्र हसुरे, ग्रामपंचायत कर्मचारी सोपान सुरवसे अंगणवाडी सेविका मंगलताई मदने
सह ग्रामपंचायतीच्या वतीने सामुदायिकरित्या आॅन लाईन व आॅफ लाईन अर्ज भरण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रतिभा काळे,विजयाबाई काळे , गंगाबाई मरबे,काशिबाई रूपनूर,पवन सुर्वे आदीसह महिला मोठ्या उपस्थित होते. याप्रसंगी सामाजीक कार्यकर्त्या संगीता सुरवसे यांनी महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.