तुळजापूर : महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार : कर्मचारी संघटनेचा इशारा
नळदुर्ग ,दि.१४ :
महाराष्ट्र शासन महसूल विभाग कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात कसलाही सकारात्मक विचार करत नसल्याने दि.१० ते १५ जुलै २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन करून दि.१५ जुलै २०२४ पासुन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी संघटनेने घेतला असून त्या अनुषंगाने तुळजापूर तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी कळविले असून संघटनेच्या निर्णयाचे समर्थन करत दि.१० जुलै २०२४ पासुन काळ्या फिती लावून काम करत आंदोलनास सुरूवात केली आहे.
या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात दि.११ जुलै रोजी तुळजापूर तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी "कर्मचारी एक जुटीचा विजय असो" "आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत" अशी घोषणाबाजी करत जेवणाच्या सुट्टीत तहसिल कार्यालया समोर निदर्शने केले तर आंदोलनच्य तिसऱ्या टप्प्यात दि.१२ जुलै रोजी लेखनी बंद आंदोलन करून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिवसभर कामावर उपस्थित राहुन लेखनीबंद आंदोलन केले.
महाराष्ट्र शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास दि.१५ जुलै २०२४ पासुन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.या एकुणच आंदोलनात आवलन कारकुन निशिकांत भोज, बालाजी चामे, उज्वला भोगे,एन.बी.येलगुंडे,मंडल अधिकारी अमर गांधले, महसूल सहाय्यक प्रताप पाटील,शिवरूद्रा स्वामी, पी.जी.कानडे, समाधान पोथरे, बाळासाहेब पवार, शिपाई नागेश गायकवाड, गोपाळ सुरवसे, आनंद देशमुख, बालाजी घोगरे,एस.ए.राऊत, यु.एम. राऊत, आदी सह कर्मचारी यांनी महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या सर्व आंदोलनात सहभागी होते तर दि.१५ जुलै पासून संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संप आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी कळविले आहे.