वागदरी (एस.के.गायकवाड):
सुरक्षा रक्षक दलातील दिवगंत सैनिक यशवंत गवळी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी दि. १३ जुन रोजी शासकिय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.
मुर्टा ता.तुळजापूर येथील मुळ रहिवासी असलेले व
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत असलेले यशवंत विश्वंभर गवळी यांचे नुकतेच नाशिक येथे कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,दोन भाऊ, पुतणे,असा परिवार आहे.
दिवंगत यशवंत गवळी हे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सैनिक म्हणून भरती झाल्यानंतर देशात विविध ठिकाणी सेवा बजावली असून नुकतेच दिल्ली येथून भारतीय मुद्रानालय नाशिक येथे त्यांची बदली झाली होती.नाशिक येथे कर्तव्यावर असताना त्यांना हृदय विकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचे दि.१२जुलै २०२४ रोजी निधन झाले.
नाशिक येथून त्यांचे पार्थिव मुर्टा येथे त्यांच्या मुळ गावी आणण्यात आले.दि.१३ जुलै रोजी गावातून अंत्ययात्रा काढूण त्यांच्या शेतात शासकीय इतमामात नंतर बौद्ध धम्म संस्कारानुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.