दीपक घोडके समाज मन जाणणारे व्यक्तिमत्व :- रामचंद्र आलुरे
खुदावाडी /आणदुर , दि.२५: सतीश राठोड :
समाज मनाची जाणीव ज्यांना असते. तेच समाजासाठी काहीतरी करू शकतात. समाजासाठी काय हवे आहे. हे ओळखून काम करणारे दीपक घोडके हे व्यक्तिमत्व आहे असे गौरवद्गार अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे यांनी काढले.
अणदूर शहर भाजपा अध्यक्ष दीपक घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी रामचंद्र आलूरे यांनी दीपक घोडके यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विवेचन करताना बोलत होते. या कार्यक्रमास ह.भ.प. संतोष झंगे महाराज , तंटामुक्त अध्यक्ष काशिनाथ शेटे , माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे , ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती .
भाजपाचे दीपक घोडके हे प्रगतशील शेतकरी तसेच शाहुपुरी तालीम, कोल्हापूर येथील तालीम मध्ये तयार झालेले एक उत्कृष्ट मल्ल म्हणून त्यांची ओळख आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून राजकीय प्रवास करीत सर्वसामान्य जनतेच्या समस्याची सोडवणूक करत आहेत . यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी घोडके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास तुळजापूर तालुक्यासह इतर जिल्ह्यातील हितचिंतक , मित्रपरिवार नातेवाईकांनी गर्दी केली होती.