नळदुर्ग शहर व परीसरात डुकरांचा हौदोस ; आर्धा एक्कर ऊसाचा फडशा पाडून शेतकऱ्याचे केले मोठे नुकसान

नळदुर्ग,दि.२५ : सुधीर पोतदार
डूकराच्या कळपाने शेतातील ऊभ्या ऊसाचे जवळपास अर्धा एकर पिक भुईसपाट केल्याने शेतक-याचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. ही घटना नळदुर्ग ते जकणी तांडा रस्त्यालगत शेतात घडल्याचे उघडकीस आले आहे.
नळदुर्ग शहरात वराह पालकांनी मोठ्या संखेने डुकरे आणुन सोडली आहेत. शहरातील गल्लो गल्ली डुकराच्या फलटणी मुक्तसंचाराने अनेक नागरिक ञस्त झाले आहेत.त्यातच डुकरांची उत्पतीही झपाट्याने वाढत आसल्याने हे शहर व परीसरातील शेतात घुसुन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत.
शहरातील जकणीतांडा रोड जवळ सिध्दु मानशेट्टी यांचे शेत असुन त्यांनी गेल्यावर्षी शेतात दिड एक्कर 86032 या ऊसाची लावन केली. जिवापाड मेहनत करुन लाखो रुपये खर्च करुन ऊसाची ते दिवसराञ जोपासना करीत आहे. सध्या ऊस बारा ते पंधरा कांड्यावर गेला आसताना सतत तिन दिवस चालु असलेल्या पावसात डुकरांनी चक्क आर्धा एकर ऊस तोडून ऊसाचा फडशा पाडला. या आगंतुक डुकरांच्या टोळीने उसाचे एवढे मोठे नुकसान केल्याने शेतकरी मानशेट्टी यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. परंतु मोठा धक्काही त्यांना बसला आहे.त्यांना महसुल व कृषी विभागाने शेतातील झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी तसेच वराह पालन करण्या-यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.