अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे खास आयोजन
मुरूम, ता. उमरगा, दि. २६ :
अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर हे मुरुमचे रहिवाशी असून त्यांच्या सेवानिवृत्तीबद्ल त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्या कार्यगौरव सोहळ्याचे खास आयोजन शनिवारी (ता. २७) रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, बिदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिरीश बदोले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा सोहळा मुरुम येथील अक्कलकोट रोड लगत असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे कार्य गौरव समितीच्या वतीने परिसरातील बंधू-भगिनींनी या सोहळ्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.