वागदरी येथे लाडकी बहिण योजनेसाठी दोनशे महिलांनी भरला अर्ज 

वागदरी ,दि.२७ : एस.के.गायकवाड:

तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील जवळपास दोनशे महिलांनी मुख्यमंत्री  लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज दाखल केला असून गावातील एकही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कीशोर धुमाळ,एस.के.गायकवाड, कीशोर सुरवसे, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनीबाई पवार, मदतनीस रूपाली जाधव, ग्रामसेवक एम.एम.तांबोळी,सरपंच तेजाबाई शिवाजी मीटकर, उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव, सर्व ग्रा.प.सदस्य जाणिव पुर्वक प्रयत्न करत आहेत.


  महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून दर महिन्याला एक हजार पाचशे ( १५०० /- ₹) अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली.सध्या संबंध महाराष्ट्रभर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‌एकात्मिक महिला व बालविकास विभागा मार्फत अर्ज भरण्याची प्रक्रिया जोरदार पुणे सुरू आहे.प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शर्ती चे प्रयत्न करताना दिसत आहेत.त्याचाच भाग म्हणून मौजे वागदरी येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ग्रामपंचायत व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.येथील भाजपाचे बुथ प्रमुख तथा मिडीया‌ विभाग तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ यांनी दोनशे अर्ज‌ मोफत‌ स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, भाजपा चे शाखा प्रमुख किशोर सुरवसे, सरपंच उपसरपंच सर्व ग्रा.प.सदस्य अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस सर्व पक्षीय कार्यकर्ते लाडक्या बहिणीला अर्ज भरण्यासाठी सहकार्य  करीत आहेत.आता‌‌ पर्यंत र्आॅफ लाईन व आॅन लाईन मिळून गावातील जवळपास दोनशे‌ महिलांनी अर्ज भरून संबंधित अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनीबाई पवार यांच्या कडे दिला असून यातील पन्नास टक्के अर्ज आॉन लाईन झाल्याचे समजते.
 
Top