कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती
शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या.
तत्कालीन प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बालाघाट शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. सुभाष राठोड यांची महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती केली होती. या कालावधीत राठोड यांची काम करण्याची तळमळ पाहून संस्थेने विद्यापीठ प्रशासनाकडे कायम स्वरूपी प्राचार्याची नेमणूक करण्याचा प्रस्ताव पाठवून सदरील पदाची मुलाखत घेऊन कायमस्वरूपी प्राचार्याची नेमणूक करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या मुलाखतीस आलेल्या प्राचार्यांच्या मुलाखती घेतल्या व डॉ. सुभाष राठोड यांची नियुक्ती केली.
आज कारगिल विजयी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित नूतन प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांचा कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील , वनस्पती विभाग प्रमुख डॉ. विजय सावंत , नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके , प्रा. आशिष तिडके यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग पोळे यांनी केले तर आभार डॉ. सचिन देवद्वारे यांनी मानले.