राज ठाकरे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक दाखल
तुळजापूर/नळदुर्ग, दि.३०
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी असल्याचे सांगितल्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.त्यानुसार मनसे सरचिटणीस तथा निरीक्षक नयन कदम, प्रवक्ते हेमंतकुमार कांबळे,सुदेश चूडनाईक,कुणाल माईणकर,घनश्याम परब,नरेश सावंत,अवधूत चव्हाण याच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर विधानसभा क्षेत्राची सद्याची राजकीय परिस्थिती,स्थानिक नागरी प्रश्न,पक्षाने केलेले विविध आंदोलने याची माहिती घेतली, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रमुख पदाधिका-यांना सूचना दिल्या, तसेच आढावा बैठक,केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड, तुळजापूर शहर उपाध्यक्ष,वेदकुमार पेंदे,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,सोमेश्वर आलूरे,दगडू लकडे, धर्मराज सावंत, अविनाश पवार , मनोज सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी तर पक्षाची कामगिरी व संघटनेबाबत माहिती देऊन जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांनी आभार मानले.