वागदरी ग्रामपंचायतीला तेरणा युथ फाॅंऊडेशनच्या वतीने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा 

 वागदरी , दि. ३१: एस.के.गायकवाड

वागदरी ता. तुळजापूर येथे  तेरणा युथ फाऊंडेशन च्यावतीने जिल्हा परिषद धाराशिवच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा  अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा फाऊंडेशनचे संस्थापक मेघ दादा पाटील यांच्या पुढाकाराने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


 या प्रसंगी तेरणा युथ ‌फाॅंऊडेशन धाराशिवच्या टीमचे वागदरी गावात आगमन होताच त्यांचे ग्रामपंचायत, भाजपा शाखा आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीने मेघ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध जिल्हाभर समाज उपयोगी  उपक्रम राबविले जात असून त्याचाच भाग म्हणून तेरणा युथ फाॅंऊडेशनच्या वतीने वागदरी ग्रामपंचायतीला 
दि.२९ जुलै २०२४ रोजी अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेडीमेड सुलभ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा रंजना राठोड, भाजपा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख विद्याताई माने, तेरणा युथ फाॅंऊडेशनचे आकाश तावडे, गणेश इंगळगी,राज नवले, विशाल पाटील, प्रविण शेटे, नितीन खंडागळे, गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, भालचंद्र यादव, माजी उपसरपंच मिनाक्षी बिराजदार,  पत्रकार कीशोर धुमाळ, भाजपा शाखा प्रमुख किशोर सुरवसे, बाळू पवार,रत्नसिंग चव्हाण,आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top