जिल्हाधिकारीचे आदेश असतानाही  घरजागेची नोंद घेण्यास न.प. प्रशासनाकडून  टाळाटाळ ;  संतप्त नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चाचा इशारा


नळदुर्ग , दि.३०

शहरातील नागरिकानी वारंवार विनंती अर्ज, अमरण उपोषण ,आदोंलन केले, जिल्हाधिकिरी यांचे आदेश असतानासुध्दा  घरजागेची नोंद घेण्यास न.प. प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने वसंतनगर व अक्कलकोट रोड सर्व्हे न. २९ मधील संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 

शासकिय जागेवर कब्जे वहिवाटीनुसार राहणाऱ्या बेघर कुटुंबाच्या घरजागेची येत्या आठ दिवसात  नगरपरिषदेत भोगवटदार म्हणून नोंद करावे, मालमत्ता कर भरून घ्यावे अन्यथा दि.२ ऑगस्ट् रोजी वसंतनगर येथिल श्री  सेवालाल सामाजिक संस्था व  सर्व्हें नं.२९ मधील नागरिकांचा दि.५ ऑगस्ट् रोजी न.प.कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी यासह सबंधीतांना निवेदनाव्दारे  दिला आहे.   

नळदुर्ग शहरातील वसंतनगर व  अक्कलकोट रोड लगत सर्व्हे नं.२९ मध्ये गेल्या ५० वर्षा पूर्वीपासून भटक्या विमुक्त समाजाचे कुटूंब शासकीय जागेवर राहत आहेत. नगरपरिषदेने जा.क्र.४३१/न.प.न./२०२३ दि.१८/०७/२०२३ रोजी आम्हाला नोटीस देऊन जिल्हाधिकारी  यांचे दि.१७/०७/२०२३ च्या आदेशानुसार रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याकरीता शासकिय जागेवरील पात्र लाभार्थ्यांकडुन आवश्यक ते कागदपत्रांची विहीत नमुन्यात प्रस्ताव दाखल करून घेतले.
त्यास  एक वर्षं उलटले. मात्र न.प.ने अद्याप पर्यंत भोगवटदार म्हणून नोंद केली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासुन  लाभार्थी वंचित राहिले. 

याप्रकरणी दि. १६ नोव्हेंबर २०२३  रोजी न.प. कार्यालया समोर वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर ,बौध्दनगर ( सर्व्हे न.२९) आदी ठिकाच्या बहुसंख्य 
नागरिकांनी  आमरण उपोषण केले होते. यावेळी नगरपरिषदेने लेखी अश्वासन दिल्याने नागरिकानी उपोषण मागे घेतले. हे आंदोलन करून १० महिने होत आले. मात्र याकडे  न.प. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. 

त्याचबरोबर मालमत्ता कराचे सर्व्हे होऊन सहा महिने उलटून गेले, तरीही सुस्त नगरपालिका प्रशासन नागरिकांकडून मालमत्ता कर भरून घेण्यास टाळाटाळ करीत आहे.  त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.


 येत्या आठ दिवसांत नगरपरिषदेने लाभार्थ्यांकडून मालमत्ता कर भरून घेऊन  घर जागेची न.प. दप्तरी नोंद घ्यावी, तसेच ८ अ नक्कल द्यावे अन्यथा वसंतनगरच्या नागरिकांचा दि. २ आॕगस्ट रोजी तर सर्व्हे न. २९ मधील नागरिक दि. ५  आंँगस्ट  रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर फुलचंद राठोड, विनायक जाधव, सुरेश राठोड, संजय जाधव, रवि राठोड, अजित चव्हाण, शेखर राठोड,  शिवाजी नाईक, अशोक बंजारे, राजाराम नाईक, राम नाईक, यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत. 

नगरपरिषद प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे शासनाचे लाखो रूपयेचा महसुल बुडत आहे. तर दुसरीकडे टेंडर काढणे, ठेकेदाराचे बील काढण्यात न.प. प्रशासन व्यस्त आहे.  त्यामुळे  सर्वसामान्य नागरिक कामासाठी न.प.चे उबंरठे झिजवत आहेत. नळदुर्ग नगरपरिषदेच्या तुघलकी काराभाराविरुध्द नागरिकात असंतोष निर्माण होत आहे.

 
Top