महामार्गावरील नळदुर्ग येथे एक कोटीपेक्षाअधिक किमंतीचा ५२८ किलो गांजासह एकास अटक: गस्ती पोलिसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक
नळदुर्ग, दि. ३१ :
भरधाव चारचाकी वाहनातून तब्बल ५२८ किलो गांजाची महामार्गावरुन वाहतुक करीत असताना नळदुर्ग पोलिसानी पेट्रोलिंग करताना रंगेहात पकडून सुमारे १ कोटी १५ लाख ७८ हजार ८०० रुपये एवढ्या किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन एकास अटक केली आहे. दरम्यान महामार्गवरील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दि 30 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची रात्री राष्ट्रीय महामार्गवर गस्त सुरु होती यावेळी उमरग्याहुन सोलापुरकडे भरधाव वेगात स्कार्पिओ गाडी क्र. एम. एच. 08 झेड 5684 ही जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गवर ही गाडी अडविली. गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा आपण सोलापुरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांचबरोबर त्याच्याकडे चौकशी केले असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी सर्व रा. सोलापुर व राहुल रा. अहमदनगर हे यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.
या आरोपीविरुध्द पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे. स्कार्पिओ गाडीतुन पोलिसांनी एकुण 528 किलो गांजा जप्त केला आहे त्याची किमत 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपये इतकी किमत आहे. गांजा व स्काकर्पिओ गाडी असा एकुण 1 कोटी 15 लाख 78 हजार 800 रु्पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने हे करीत आहेत.सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने, सुरज देवकर,विजय आटोळे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे,संतोष गिते, विजय थोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाजी गायकवाड, सुरेश सगर, अमर जाधव, सूर्यकुमार फुलसुंदर, बालाजी शिंदे ,दत्ता हिंगे, दत्ता कुंभार, शंकर कांबळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.