ताज्या घडामोडी


नळदुर्ग शहरात भागवत सप्ताहचे आयोजन

नळदुर्ग,दि.१०

शहरातील आदर्श शिक्षक वसंतराव अहंकारी यांच्या निवासस्थानी मागील 51 वर्षांपासून भागवत सप्ताहचे आयोजन केले जात असुन यावर्षी दि. 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान हा भागवत सप्ताह  होत आहे.


वे.शा.सं. श्रीराम जोशी महाराज यांच्या अमृत मुखातून भागवत कथा सांगितली जाते.. दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेते भागवत कथेचे संस्कृतमध्ये वाचन केले जाते आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत मराठी मध्ये भागवत कथा सांगितली जाते.. ही कथा ऐकायला शेकडो भाविक येतात. 15 जुलै पासून सुरु होणाऱ्या या भागवत सप्ताह मध्ये 17 जुलै रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. तर दि. 19 जुलै राजी गोपाळ काला केला जातो.

या भागवत सप्ताहाचा समारोप दि. 21 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी होतो. या दिवशी संपूर्ण नळदुर्ग शहरातील भाविक दर्शनाला येतात. अहंकारी परिवाराकडून महाप्रसादाचे वाटप केले जाते. नळदुर्ग शहरात या 7 दिवसात धार्मिक वातावरण निर्माण होते.
गेल्या 51 वर्षांपासून अविरतपणे अहंकारी कुटुंब ही सेवा पार पाडत आहेत.आता हा भागवत सप्ताह हा अहंकारी कुटुंबापुरता मर्यादित न राहता आता तो संपूर्ण नळदुर्गकरांचा  झाला आहे.


तरी सर्व भावीकांनी या भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत अहंकारी, बाबुराव अहंकारी, बळवंत अहंकारी,अनंत अहंकारी,सुनिल पाटील,विकास अहंकारी,वैभव अहंकारी,योगेश अहंकारी , माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आवाहन केले आहे.
 
Top