अणदूर, नळदुर्ग, जळकोट, इटकळ येथील डॉक्टरांच्या संघटनेचा  बंदमध्ये सहभागी; नळदुर्ग पोलिसांना निवेदन देवुन नराधमावर कठोर कारवाईची केली मागणी

अणदूर, दि.१७

कोलकत्ता येथील कर्तव्यावर असलेल्या कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरवर अमानवीय कृत्य करून त्यांचा खून करणाऱ्या नराधमास पकडून कठोरातील कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी संपूर्ण भारतातील डॉक्टरानी एक दिवसाचा बंद पुकारला असल्याने त्याला पाठिंबा म्हणून अणदूर, नळदुर्ग, जळकोट, इटकळ येथील डॉक्टरांच्या संघटनेने आपली प्रॅक्टिस एक दिवस बंद ठेऊन काळ्या फिती लावून नळदुर्ग स्टॅण्ड ते पोलीस स्टेशन पर्यंत मूक मोर्चा काढला,या वेळी नळदुर्ग पोलिसांना निवेदन देण्यात आले, या बंदला नळदुर्ग अणदूर जळकोट इटकळ येथील औषधी व्यावसायिकांनी पण पाठिंबा दिला होता त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


डॉक्टर हे जनतेचे प्राण वाचवण्यासाठी असतात परंतु कोलकत्ता येथे कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर अमानुष कृत्य करून त्यांचा खून करण्यात आला हे अत्यंत घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी व या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, डॉक्टरांना सुरक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन डॉक्टर व केमिस्ट संघटनेने नळदुर्ग पोलिसांना दिले आहे. 

 यावेळी डॉ सिद्रामपा खजुरे, डॉ जितेंद्र कानडे, डॉ मोहन मोजगे, डॉ संजय कदम, डॉ सुरज शेख, डॉ नागनाथ कुंभार, डॉ शशी तोडकरी, डॉ सौ रुपाली कानडे, डॉ सौ स्वाती पाटील, डॉ सौ शेख, डॉ सौ नरवडे, डॉ यशवंत नरवडे, डॉ अमर कंदले, डॉ सतिश घुगे, डॉ प्रशांत झंगे, डॉ हरिदास मुंडे, डाँ. सचिन पाटील आदी मान्यवरांसह अणदूर नळदुर्ग जळकोट इटकळ येथील सर्वच डॉक्टर मंडळी उपस्थित होती.

 या बंदला केमिस्ट संघटनेने पाठिंबा दिल्याने केमिस्ट संजय जाधव, गुणवंत मुळे, गोविंद शिंदे, जीवन मोजगे, महेश कारले, वैजिनाथ कुंभार, सचिन कासार, गणेश मोरडे,  आदी मान्यवरांसह वरील 4 ही गावातील 30 औषधी दुकानदार उपस्थित होते.
 
Top