शालेय पाठ्य पुस्तका बरोबरच संगणकिय शिक्षणाला अवांतर पुस्तक वाचनाने ज्ञान प्राप्त होते : अभिजित जोशी 

वागदरी (एस.के.गायकवाड):

सध्याच्या संगणकीय युगात शालेय पाठ्यपुस्तका प्रमाणे दिले जाणाऱ्या शिक्षणा बरोबर संगणकीय शिक्षण देणे  गरज आहे. हे जरी खरे असले तरी शालेय आणि संगणकीय शिक्षणाला अवांतर पुस्तके वाचनाची जोड दिल्यास खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होते. तेंव्हा विद्यार्थ्यांमध्ये अवांतर पुस्तके वाचनाची आवड निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.कारण संगणकीय शिक्षणाने अत्यावश्यक माहिती मिळते तर अवांतर पुस्तके वाचनाने ज्ञान मिळते असे प्रतिपादन सिस फाऊंडेशन डोंबिवलीचे विश्वस्त अभिजित जोशी यांनी जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.
 

 धाराशिव जिल्ह्यातील वागदरी ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वागदरीचे सुपुत्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या प्रयत्नातून आणि सिस फाऊंडेशनचे विश्वस्त अभिजित जोशी यांच्या पुढाकाराने येथील जिल्हा परिषद शाळेला डोंबिवली येथील सिस फाउंडेशनच्या वतीने बेंगलोर येथील डॉ.धनंजय पाटणकर यांचे आजोबा कै.पांडुरंग बापुजी पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० संगणक आणि फर्निचरसह अद्यावत स़ंगणकीय कक्ष समर्पित करण्यात आले असून 
दि.१५ आॉगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अभिजित जोशी यांच्या हस्ते तर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बाळासाहेब हंगरगेकर, गावचे सरपंच उपसरपंच,ग्रा.प.सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामस्थ पालक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या अद्यावत संगकणक कक्षाचे समर्पण (उद्घाटन) करण्यात आले.


पुढे बोलताना अभिजित जोशी म्हणाले की, या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुर्गम आणि अविकसित जिल्ह्यामध्ये संगणक तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक सोयी पोचवू शकलो आणि थोड्या प्रमाणात समाजऋण फेडता आले याचाच आनंद मोठा आहे तर संगणक कक्ष समर्पण कार्यक्रमासाठी आवर्जून हजर असलेले  राज्य पोलीस प्राधिकरण मुंबई चे न्यायिक सदस्य आणि वागदरीचे सुपुत्र उमाकांत मिटकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी आमच्या धाराशिवची ओळख आहे.ती ओळख पुसण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या संगणक कक्षाच्या माध्यमातून शाळेसाठी दिलेली मदत ही आमच्यासाठी लाखमोलाची आहे.त्यामुळे तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.या कार्यक्रमाचे   प्रास्ताविक व  सूत्रसंचालन सहशिक्षक तानाजी लोहार यांनी केले तर आभार  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती महादेवी जत्ते  यांनी केले.
समर्पण कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या सर्व मंडळींचे, बंगलोर निवासी डॉ. धनंजय पाटणकर व श्री उमाकांत  मिटकर यांचे  जे जयदत्त आणि सिस फाउंडेशन डोंबिवली यांचे आभार  मानले.
 
Top